लग्नानंतर पतीकडून होणारी सर्वात सामान्य चूक म्हणजे त्यांच्या पत्नीसोबत चांगला वेळ घालवण्याकडे दुर्लक्ष करणे. कौटुंबिक आणि कामाच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. यामुळे अनेकदा ते जोडीदाराकडे दुर्लक्ष करतात, हे त्यांना आवडत नाही.
वडिलधार्यांचा आणि कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असले तरी, वैवाहिक जीवनाशी संबंधित निर्णय हे परस्पर प्रयत्नपूर्वक घेतले पाहिजेत. पत्नीच्या मतांकडे दुर्लक्ष करायला नको.
अनेक पतींना लग्नानंतर त्यांची बॅचलर जीवनशैली सोडून देणे आव्हानात्मक वाटते. यामुळे त्यांच्यात मतभेद होऊ शकतात.
आईची भूमिका कोणीही बदलू शकत नाही, परंतु जेव्हा पती कामांसह प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्या पत्नीवर खूप जास्त अवलंबून असतात, तेव्हा त्यांची चिडचिड होण्याची शक्यता असते.
अनेक भारतीय कुटुंबांमध्ये मुलांच्या संगोपनाची जबाबदारी प्रामुख्याने आईवर येते. जेव्हा पती मुलांच्या संगोपनाच्या जबाबदाऱ्यांमध्ये सक्रियपणे सहभागी होत नाहीत, यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो.
वैवाहिक जीवनात भावनिक आधार महत्त्वाचा असतो. कठीण काळात आपल्या पत्नीला भावनिक आधार देण्यात अपयशी झाल्यास असंतोष निर्माण करू शकतात.
जोडीदाराच्या प्रयत्नांना गृहीत धरल्याने वैवाहिक जीवनाचा पाया नष्ट होऊ शकतो. नियमितपणे एकमेकांबद्दल कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त करणे महत्वाचे आहे. (All Photo Credit : Freepik) (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)