वजन कमी करा, जास्त पगार मिळवा! 'या' कंपनीची कर्मचाऱ्यांना भन्नाट ऑफर

मोठी समस्या

वाढलेलं वजन हा जगभरातील अनेकांसाठी समस्या ठरत आहे.

इच्छा असूनही...

अनेकांची इच्छा असूनही त्यांना वजन कमी करता येत नाही.

वजन कमी करायचा उत्साह मावळतो

काही काळ टाएट किंवा जीम जॉइन केल्यानंतर अगदी आठवड्याभरात पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' म्हणत दैनंदिन आयुष्य सुरु होतं आणि वजन कमी करायचा उत्साह मावळतो.

कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी खास ऑफर

मात्र आपले कर्मचारी सुदृढ असावेत या हेतूने एका कंपनीने कर्मचाऱ्यांचं वजन कमी करण्यासाठी एक खास ऑफर दिली आहे.

मिळतात भरपूर पैसे

या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वजन कमी केलं तर त्यांना कंपनीकडून भरपूर पैसे दिले जात आहेत.

कोणती कंपनी?

समोर आलेल्या माहितीनुसार, वजन कमी केल्यावर कर्मचाऱ्यांना अधिक वेतन देणारी ही कंपनी चीनमधील गुआंग्डोंग प्रांतातील शेनजेन येथे आहे. या कंपनीचं नाव 'इन्स्टा 360' असं आहे.

नोंद ठेवली जाते

कंपनीने वजन कमी करण्याची ही अनोखी अट ऐच्छिक ठेवली असून सहभागी लोकांचे तीन गट करण्यात आले आहेत. दर आठवड्याला त्यांच्या वजनाची नोंद ठेवली जाते.

किती बोनस मिळतो?

ग्रुपमधल्या प्रत्येकाने अर्धा किलो वजन कमी केलं तर त्यांना प्रत्येकी 400 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार पाच हजार रुपये वेट लॉस बोनस म्हणून दिले जातात.

दंडही भरावा लागतो

मात्र या उलट वजन वाढलं तर वेतनकपात किंवा 500 युआन दंडही भरावा लागतो.

150 लोकांना फायदा

कंपनीने ही योजना सुरु केल्यापासून कंपनीतील 150 लोकांनी एकूण 800 किलो वजन कमी केलं आहे.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलाही निर्णय घेण्याआधी आपल्या फॅमेली डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story