केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे 'या' ड्रायफ्रुट्सचं पाणी

Intern
May 02,2025


ड्रायफ्रुट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्याचप्रमाणे, अनेक ड्रायफ्रुट्स केसांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरतात.


मनुके हे केसांसाठी खूप फायदेशीर मानले जातात. मनुके पाण्यात भिजवून त्याचे पाणी प्यायल्याने केसांची वाढ लवकर होते.


मनुक्याच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक तत्त्वे असतात. जे केसांना मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.


मनुक्यामध्ये नैसर्गिक लोह असते, त्यामुळे केसगळती कमी होते.


हे पाणी टाळूतील रक्तप्रवाह वाढवते. ज्यामुळे केस अधिक मजबूत होतात.


मनुक्याच्या पाण्यात व्हिटॅमिन C असते. जे कोलेजन निर्मितीस मदत करून केसांना मजबुती देते.


मनुक्याचे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि केसांचा कोरडेपणा कमी होतो.


यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन B केसांना आतून आणि बाहेरून मजबूत करण्यास मदत करते.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story