ओवा, जीरा आणि बडीशेपची पावडर हा एक अत्यंत प्रभावी आणि पारंपारिक घरगुती उपाय आहे, ज्याचे सेवन केल्याने अनेक आरोग्य समस्यांपासून आराम मिळू शकतो.
ही पावडर विशेष म्हणजे पचन आणि पोटाशी संबंधित समस्यांसाठी फायदेशीर आहे.
जीरा, ओवा आणि बडीशेपची पावडर पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांमध्ये अन्नाचे योग्य पचन होण्यास मदत करते.
यामुळे पोट हलके आणि स्वच्छ राहते. पोटातील गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून आराम मिळवता येतो.
ही पावडर पोटातील पित्त कमी करते, त्यामुळे गॅस, अपचन आणि पोटफुगी कमी होण्यास मदत होते.
या पावडरमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
जीरा आणि बडीशेपेमध्ये जस्त, लोह आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे असतात, जी हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.
ही पावडर मेटाबॉलिझम नियंत्रणात ठेवते आणि शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)