भारतात सर्वाधिक प्रमाणात गव्हाच्या पोळीचे सेवन केले जाते.
गव्हाच्या पोळीपेक्षा या धान्यापासून तयार केलेल्या भाकऱ्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
हे धान्य म्हणजे नाचणी. नाचणीत कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, फायबर्स आणि अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात.
नाचणीत लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे अॅनेमियाशी लढण्यास मदत होते.
नाचणीची भाकरी खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ती फायदेशीर ठरते.
नाचणीत असलेले कॅल्शियम हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते.
या धान्यात फायबर्सही भरपूर असल्यामुळे पचनाशी संबंधित त्रासांपासून आराम मिळतो.
दररोज नाचणीची भाकरी खाल्ल्यास वजनही नियंत्रणात राहते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)