केसामुंळे सौंदर्य वाढते असे म्हणतात.आपले केस लांब आणि घनदाट असावेत असे सर्वांनाच वाटते.
केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण बऱ्याच प्रकारचे उपाय करत असतो पण त्यामधून फारसा बदल दिसून येत नाही.
जास्वंदाचे फूल केसांसाठी फायदेशीर आहे हे आपल्याला माहितच आहे.
जास्वंदाचा फूलामध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन C असते जे केसांना नॅचरल कंडिशनर करण्याचे काम करते.
केस गळती थांबवण्यासाठी हे फूल फायदेशीर आहे
जास्वंदाचे फूल डैंड्रफ कमी करण्यासाठी मदत करते आणि फंगसपासून दूर ठेवते.
जास्वंदाचा फूलाचे तेल केसांना लावले तर पांढऱ्या केसांची समस्या दूर होते.