एका चुटकीसरशी सोला लसूण, जाणून घ्या अत्यंत सोप्या टिप्स
Nov 01,2023
लसूण हा रोजच्या स्वयंपाकातील महत्त्वाचा भाग आहे. एखाद्या पदार्थाची चव वाढवायची असेल तर त्याल लसूण वापरतात. पण हा लसूण सोलणं सर्वात त्रासदायक बाब असते.
1-2 पाकळ्या असतील तर ठीक, पण संपूर्ण लसूणच सोलायचा असतो तेव्हा फार त्रासदायक असतं. त्यात वेळही भरपूर जातो.
तुम्हालाही जर लसूण सोलणं कंटाळवाणं वाटत असेल तर या टिप्सचा अवलंब करा. यासह तुम्ही काही मिनिटात लसूण सोलू शकता.
तर तुमच्याकडे ओव्हन असेल तर लसणाच्या पाकळ्या एका प्लेटमध्ये टाकून 1 ते 2 मिनिटांसाठी बेक करा. बेक केल्यानंतर साली आपोआप वेगळ्या होतील.
जर ओव्हन नसेल तर चिंता करु नका. तुम्ही तवादेखील वापरु शकता. चपातीच्या तव्यावर लसणाच्या पाकळ्या ठेवा आणि नंतर त्यावर एक वाटी ठेवा. साली आपोआप वेगळ्या होतील.
जर तुम्ही लसूण सोलण्याआधी कोमट पाण्यात भिजवून ठेवले तर काही सेकंदात साली वेगळ्या होतील.
लसूण सोलताना आधी त्याचा वरील भाग काढणं ही योग्य पद्दत आहे. यामुळे सोलताना जास्त त्रास होत नाही.
याशिवाय एका डब्यात तुम्ही लसूण टाकून जोरजोराने हलवा. यामुळे साली हलक्या होतात, तर काही निघून जातात.