शेगडीच्या एखाद्या बर्नरची फ्लॅम कमी झाली का कामाचा पसाराही वाढत जातो. कारण स्वयंपाकाचा वेळही वाढत जातो. कधीकधी अशावेळी स्वयंपाकही बिघडतो.
गॅसची शेगडी बिघडलीये असं समजून आपण दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीला बोलावतो. पण तोपर्यंत आपल्याया अशाच कमी फ्लेम असलेल्या गॅसवर काम करावे लागते.
घरच्या घरीही तुम्ही गॅसची शेगडीची कमी झालेली फ्लॅम पूर्ववत करु शकता. ही पद्धत शिकून घ्या.
एक ग्लास कडकडीत गरम पाणी घेऊन त्यात दोन चमचे मीठ टाका.
आणखी एक भांडे घेऊन त्या भांड्यात 1 चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात 1 चमचा डिश वॉश टाका आणि ते मिश्रण एकत्र करुन घ्या
या मिश्रणात आता मीठाचे पाणी टाका. त्यानंतर सगळ्या मिश्रणाचा फेस तयार होईल. त्यानंतर यात कमी फ्लॅमवर चालणाऱ्या गॅस शेगडीचे बर्नर 10 मिनिटांसाठी ठेवा
10 मिनिटांनंतर टुथब्रशने गॅस बर्नर आतून बाहेरुन घासून घ्या. व पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
मात्र एक लक्षात घ्या, स्वच्छ केलेले बर्नर पूर्णपणे कोरडे होईल तेव्हाच ते गॅसला लावा