बाजारातील पापडापेक्षा टॉमेटोचे क्रिस्पी पापड अधिक चवदार आणि दीर्घकाळ टिकणारे असतात.
टॉमेटोपासून क्रिस्पी आणि चवदार पापड कसे बनवायचे?
सर्वप्रथम 2 किलो टॉमेटो स्वच्छ धुवून घ्या आणि त्यांची मिक्सरमध्ये प्युरी बनवून घ्या.
या प्युरीला चाळणीने चाळून त्याचा रस काढा आणि तो रस मंद आचेवर शिजवा.
जेव्हा प्युरी घट्ट होईल, तेव्हा त्यात मीठ, लाल तिखट पावडर आणि थोडी जीरे पावडर घाला.
तयार मिश्रणाला एका प्लॅस्टीक शीटवर पातळ थराप्रमाणे पसरवा.
हे मिश्रण चांगले सुकेपर्यंत उन्हात ठेवा. नंतर त्यांना प्लॅस्टीक शीटवरून वेगळे करून टुकडे करा.
या पापडांना एयरटाइट कंटेनरमध्ये ठेवावे. या पापडांना तुम्ही भाजू शकता किंवा तेलात तळूनही खाऊ शकतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)