जिभेवर दिसणारी 5 लक्षणं म्हणजे कॅन्सरची सुरुवात; डॉक्टरांचा सल्ला घेतलात का?

Pravin Dabholkar
Jun 02,2025


कॅन्सरची सुरुवात शरीरातील वेगवेगळ्या भागापासून होऊ शकते. यात जीभ एक महत्वाचा अवयव आहे. जिभेवर वारंवार कोणती लक्षणे दिसतात तेव्हा दुर्लक्ष करु नका.


ही लक्षणे म्हणजे कॅन्सरची सुरुवात असू शकते. योग्य वेळी ओळखल्यास आणि उपचार घेतल्यास यातून वाचू शकता.


कॅन्सरच्या सुरुवातील जीभेचा रंग वेगळा दिसू लागतो. तुमच्या जीभेवर बराच काळ पांढरा, लाल पॅच असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.


काही जखम नसतानाही जीभेतून रक्तस्त्राव, खाताना वारंवार ब्लिडींग असेल तर हे कॅन्सरचे लक्षण असू शकते. याकडे दुर्लक्ष करु नका.


जीभ बाहेर काढल्यावर अथवा हलवल्यास दुखत असेल तर सामान्य अल्सर असू शकतो. पण हे सातत्याने होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.


जीभेवर सतत म्यूकस मोठा थर जमा झाला आणि ब्रशनेही स्वच्छ होत नसेल तर कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणापैकी एक असू शकतो.


कोणती जखम नसताना जबडा किंवा चीभेच्या टोकावर सतत दुखत राहणं कॅन्सरचं लक्षण असू शकतं.


तंबाखू, दारु, अनहेल्दी खाणं, खराब जीवनशैली ही कॅन्सरची कारणे आहेत. यातून वाचण्यासाठी वाईट सवयी सोडण्याचे आवाहन डब्ल्यूएचओने केलंय.


तुमच्या जीभेवर कोणती असामान्य लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्यवेळी इलाज कॅन्सरवर मात करण्यास मदत करु शकतो.


(Disclaimer - येथे दिलेल्या टीप्स सामान्य माहितीवर आधारित आहे. त्या स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)

VIEW ALL

Read Next Story