जीभेच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात; होऊ शकतात 'या' गंभीर समस्या

Published by: Diksha Patil | May 09, 2025

जेव्हा केव्हा ओरल हेल्थची काळजी घेण्याविषयी बोलतात तेव्हा लोकां दातांची स्वच्छता आठवते. अनेक लोकं ही तक्रार करतात की ते ब्रश करतात तरी देखील त्यांच्या तोंडातून दुर्गंधी येते.

Published by: Diksha Patil | May 09, 2025

पण जीभेकडे सगळे कायमच दुर्लक्ष करतात. पण कशी काळजी घ्यायची त्याविषयी जाणून घेऊया.

Published by: Diksha Patil | May 09, 2025

जीभेची स्वच्छता ही तितकीच गरजेची आहे जितकी दात साफ करण्याची गरज आहे.

Published by: Diksha Patil | May 09, 2025

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जर फक्त 1-2 दिवसांसाठी नाही तर संपूर्ण महिन्यासाठी नाही घासली तर काय होईल?

Published by: Diksha Patil | May 09, 2025

हॅलिटोसिस

महिनाभर जर तुम्ही जीभ साफ केली नाही तर जीभेवर खूप बॅक्टेरिया जमा होईल आणि त्यामुळे दुर्गंधी पसरू शकते. त्याचं कारण तुमच्या तोंडातून येणारी दुर्गंधी आहे.

Published by: Diksha Patil | May 09, 2025

जिभेला चव नसणं

जीभ साफ नसेल तर जे बॅक्टेरिया हे तुमच्या जीभेवर असतात ते टेस्ट बड्सला ब्लॉक करू शकतात. त्यामुळे तुमची चव घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही पदार्थाची योग्य चव येत नाही.

Published by: Diksha Patil | May 09, 2025

ओरल थ्रश

जर तुम्ही एक महिना जीभ साफ केली नाही तर तुम्हाला फंगल इन्फेक्श होऊ शकतं. ओरल थ्रश एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन आहे ज्यात पांढरे डाग आणि इतर काही समस्या होण्याची शक्यता असते.

Published by: Diksha Patil | May 09, 2025

काळी

ही देखील एक समस्या आहे. जीभ साफ केली नाही तर डेड सेल्स हे जीभेत अडकून राहतात आणि त्यामुळे जीभ काळी पडते आणि खरखरीत दिसू लागते.

Published by: Diksha Patil | May 09, 2025

हिरड्यांचे आजार

जीभ साफ केली नाही तर त्यावर असलेले बॅक्टेरिया हे हिरड्यांपर्यंत पोहचतात आणि त्यामुळे पेरियोडोंटल समस्या उद्भवू शकतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Diksha Patil | May 09, 2025

VIEW ALL

Read Next Story