बद्धकोष्ठतेसाठी आरोग्यदायी आहेत 'हे' लाडू; जाणून घ्या, लाडू बनवण्याची पद्धत

Mar 03,2025


अनेकजण बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी बरेच उपाय करतात.


आज आम्ही तुम्हाला एक अशी रेसिपी सांगणार आहोत, ज्याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेला दूर करण्यास मदत होईल.


बद्धकोष्ठतेवर उत्तम उपाय असणारे लाडू बनवण्यासाठी अंजीर, खजूर, मनुके आणि थोडा सुका मेवा घ्या.


हे साहित्य मिक्सरमध्ये बारीक करुन यामध्ये चवीप्रमाणे गुळ आणि थोडे तुप घालून मिश्रण तयार करुन घ्या.


आता तयार झालेल्या मिश्रणाचे लहान आकारात लाडू वळून घ्या.


हे लाडू फायबरयुक्त असून यांच्या सेवनाने पचनसंस्था मजबूत होण्यास मदत होते.


दररोज हा एक लाडू खाल्ल्याने पोटासंबंधी आजार दूर होण्यास मदत होते.


यामध्ये साखर आणि कोणत्याही प्रिझरवेटिव्हजचा वापर केला नसल्याने आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरते.


बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी दररोज सकाळी नाश्यात या लाडूचे सेवन करणे फायद्याचे ठरेल.

VIEW ALL

Read Next Story