तुम्हाला जर का सतत बाहेरचे पदार्थ खाण्याची सवय असेल तर ती तुम्ही वेळीच मोडणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानं तुमच्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो.
तुम्ही कामात प्रचंड बिझी असाल तर आधी हातातलं काम संपवा परंतु काम करत असताना जेवणं हे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
वेळेवर न झोपल्यानं तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते तेव्हा अति जागरण करू नका.
व्यायाम हा आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे परंतु त्याचा अतिरेक हा आपल्यासाठी अत्यंत घातक आहे. तेव्हा व्यायामाचा कधी अतिरेक करू नका.
आपल्यालाही अनेक वाईट सवयी असतात तेव्हा सवयी दूर करणे हे अत्यंत आवश्यक असते. तेव्हा या काही सवयी तुम्ही वेळीच दूर करणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.