मधुमेह हा आजार शरीरातील रक्ताच्या पातळीत साखरेची वाढ झाल्यामुळे होतो.केवळ वृद्धच नाही तर तरुण लोकही मधुमेहाच्या विळख्यात येत आहेत.
मधुमेहा हा आजार खराब जीवनशैली आणि ताणतणावामुळे रुग्णांमध्ये झपाट्याने वाढतांना दिसत आहे. मधुमेहावर कोणताही इलाज नाही आणि तो फक्त नियंत्रित केला जाऊ शकतो.
मधुमेहाच्या रुग्णांना आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावीलागते त्यांनी आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा, ज्यामुळे त्याच्या शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते.
मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी या भाज्यांचं सेवन केल्यास उपयुक्त ठरेल.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी टोमॅटो खूप फायदेशीर ठरतं. यामध्ये लाइकोपीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात रहाते. यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
पालक हा लोहाचा समृद्ध स्रोत मानला जातो यामध्ये सर्व प्रकारची पोषक तत्वे आढळतात. पालक मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान ठरते. पालकमुळे शरीरातील इंसुलिन संवेदनशीलता सुधारते.
भेंडीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि भेंडी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते. भेंडीमध्ये आढळणारे फायबर आतड्यातील साखरेचे शोषण कमी करते. याशिवाय इतर अनेक आजारांवर भेंडी खूप फायदेशीर आहे.
ब्रोकलीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असत त्यामुळे ब्रोकली खाणे शरीरासाठी उपयुक्त असते. ब्रोकलीला स्टार्च नसलेली भाजी आहे. फायबरच्या अतिरिक्त प्रमाणामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.