दह्यासारखेच ताक देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
मात्र, काही जणांना ताकात मीठ घालून प्यायला आवडते, तर काहीजण साखर घालून गोड ताक पितात.
पण या दोघांपैकी आरोग्यास अधिक फायदेशीर कोणते ताक आहे, हे अनेकांना माहिती नसते.
तर जाणून घेऊयात गोड ताक चांगले की खारट ताक?
मीठ घालून तयार केलेले ताक हे गोड ताकाच्या तुलनेत अधिक फायदेशीर मानले जाते.
यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.
यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, जे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि शरीराला थंडावा देण्यासाठी खारट ताक उपयुक्त ठरते.
गोड ताकामध्ये असे कार्बोहायड्रेट्स असतात जे शरीराला तात्काळ उर्जा देण्याचे काम करतात.
मात्र, साखरेचे प्रमाण अधिक असल्यास ते आरोग्यास धोकादायक ठरू शकते. म्हणूनच गोड ताक मर्यादित प्रमाणातच प्यावे.