उन्हाळ्यात सगळ्यांनाच कलिंगड खायला खूप आवडते.
जर तुम्ही सुद्धा बिया निरुपयोगी समजून फेकून देत असाल तर आताच थांबा. कारण कलिंगडाच्या बियांमध्ये तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
कलिंगडाच्या बियांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जे शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे प्रदान करतात.
या बियांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि पॉलीअनसॅच्यूरेटेड फॅट्स असतात. जे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
कलिंगडाच्या बिया कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतात.
यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स असतात. जे शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवण्यास मदत करतात.
तसेच यामध्ये वृद्धत्वविरोधी घटक देखील आढळतात. त्यामुळे हे वृद्धत्त्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करतात आणि तुम्हाला निरोगी ठेवतात.
बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात.
हे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते आणि आतडे स्वच्छ ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)