जर तुम्ही सुद्धा रोज हाय हिल्स घालत असाल. तर या समस्या होण्याच्या अधिक शक्यता आहेत. जाणून घेऊयात सविस्तर.
हाय हिल्स घालण्यामुळे पायांच्या बोटांवर अधिक दबाव पडतो. ज्यामुळे पायाला सूज आणि वेदना होऊ शकतात.
जास्त वेळ हाय हिल्स घातल्याने पायांची स्थिती खराब होऊ शकते आणि पायांच्या सांध्यांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.
हाय हिल्स घातल्याने पाठीच्या कण्यावर आणि स्नायूंवर जास्त ताण येतो. ज्यामुळे पाठदुखी होऊ शकते.
तसेच जास्त वेळ घातल्याने आपल्या शरीराचे संतुलन बिघडू शकते. ज्यामुळे शरीराच्या अन्य भागांवरही दबाव येतो.
हाय हिल्समुळे पायाच्या घोट्यांवर अधिक दबाव पडतो. ज्यामुळे घोट्याच्या दुखापतीचा धोका वाढतो.
हाय हिल्स घालून चालताना चालण्याचा अंदाज बदलतो. ज्यामुळे पायात असमान ताण पडतो.
हाय हिल्सचा अति वापर केल्यामुळे महिलांना जास्त शारीरिक त्रास होतो. त्यामुळे हिल्सचा वापर जास्त करु नये.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)