चपाती की भात, काय खाल्ल्यानं शरीराला पुरेशी उर्जा मिळते? आहार तज्ज्ञांच्या माहितीनुसार या दोन्ही पदार्थांमध्ये विविध प्रमाणात पोषक तत्त्वं असतात.
वजन कमी करण्यासाठी दोन्ही पदार्थांची मदत होते. त्यामुळं या पदार्थांचं सेवन करा, मात्र भूक मारू नका.
आहार तज्ज्ञांच्या मते वजन नियंत्रणात आणण्यासाठी ज्वारी, नाचणी आणि बाजरीपासून तयार करण्यात आलेली भाकरी सर्वाधिक फायद्याची.
मिश्रपीठांची चपातीसुद्धा शरीरासाठी फायद्याची. मिश्रपीठांच्या चपातीमध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असते. ज्यामुळं इंसुलिनची पातळी वेगानं वाढत नाही.
मिश्रपीठांच्या चपातीमध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळं वजन नियंत्रणात आणण्यामध्येही त्याची मोठी मदत होते.
भाताचं सांगावं तर, पांढऱ्या फडफडीत भाताऐवजी ब्राऊन राईस किंवा उकडीचा भात फायद्याचा. आहारामध्ये भात आणि चपातीचं प्रमाण संतुलित असल्यास त्याचा वजन कमी करण्यात आणि नियंत्रणात ठेवण्यात मोठी मदत करतो.
चपाती आणि योग्य प्रतीचा भात यामुळं रक्तातील साखरेचं प्रमाणही नियंत्रणात राहतं. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून आहारातील बदलांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )