वजन कमी करण्यासाठी आजकाल लोकं अनेक पद्धतींचा अवलंब करतात. यामध्ये डाएट, सप्लिमेंट यांचा समावेश असतो.
तुम्हाला माहितीये का? पाणी पिऊन देखील तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. यासाठी केवळ तुम्हाला योग्य पद्धतीची माहिती पाहिजे.
रिसर्चनुसार, जर तुम्ही योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात पाणी प्यायलात तर तुमचं वजन कमी होऊ लागतं.
नॅशनल लायब्ररी ऑफ सायन्सचा एक रिसर्चनुसार, 30 ते 59 टक्के अमेरिकेतील तरूण जे वजन कमी करतात ते केवळ पाणी पिण्यावर भर देतात.
अधिक प्रमाणात पाणी प्यायल्याने वजन मेंटेन करण्यास मदत होते.
रिसर्च सांगतो की, पाणी प्यायल्यानंतर 10 मिनिटांच्या आत 24-30 टक्के कॅलरी बर्न होण्यास वाढ होते.
अजून एका रिसर्चनुसार, जास्त वजन असलेल्या मुलांनी थंड पाणी प्यायल्यावर आराम केल्यानंतर कॅलरी बर्न झाल्याचं दिसून आलं.