वयाच्या तिशीनंतर पुरुषांची पाठ का दुखू लागते?

पाठदुखीची समस्या आता सामान्य झाली आहे. महिला, पुरुष सर्वांनाच पाठदुखीची समस्या जाणवत असते.

पाठदुखीची कारणं काय?

पण महिलांना होणारी ही पाठदुखी पुरुषांच्या तुलनेत वेगळी असते. दरम्यान, पुरुषांना खासकरुन वयाची तिशी ओलांडल्यानंतर पाठदुखी होत असते. याची कारणं जाणून घ्या

वाढलेलं पोट

अनेक पुरुषांचं पोट वाढलेलं असतं. हे पाठदुखीच्या प्रमुख कारणांपैकी आहे. पोट वाढलं असल्याने शरिराचं वजन असमान पद्दतीने असंतुलित होतं. यामुळे पाठीवर जोर पडतो. लिगामेंट्स खेचल्या जातात. यामुळे पाठदुखीचा त्रास होतो.

चुकीच्या पद्धतीने उठणं आणि बसणं

पुरुष कार्यालयात काम करताना अनेकदा चुकीच्या पद्धतीने बसतात. यावेळी चुकीच्या पद्धतीने उठबस होत असते.

कमी लवचिकता

आपलं वय वाढलं असून, शरिराचा लवचिकपणा कमी झाला आहे याकडे पुरुष लक्ष देत नाहीत. कमी वयात कशाही प्रकारे उठबस केल्याने शरिराला त्रास होत नाही. पण वय वाढल्यानंतर शरिराला सहन होत नाही. याचे चुकीचे परिणाम होतात.

व्यायाम न करणं

धावपळीच्या आयुष्यात पुरुषांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली त्यांना योग किंवा व्यायामाची संधी मिळत नाही. त्यामुळे शरिरातील हाडं, स्नायू कमकुवत होतात.

कमकुवत हाडं

चुकीचा डाएट, कॅल्शिअम आणि विटॅमिनची कमतरता आणि मद्यपान या गोष्टीही पाठदुखीला कारणीभूत असतात.

धूम्रपान

धूम्रपानामुळे हाडांवर कॅल्शियमची झीज वाढते आणि ती कमकुवत होते. यामुळे हाडे आणि स्नायू कमकुवत होतात.

हर्नियेटेड डिस्क

हर्नियेटेड डिस्कला मणक्याचा खालचा भाग म्हणतात. काही कारणास्तव ते सामान्य पातळीच्या बाहेर गेले तर पाठदुखी होऊ शकते.

सांधेदुखी

सांधेदुखीमुळे पाठदुखी होऊ शकते. झोपेशी संबंधित समस्यांमुळे एखाद्या व्यक्तीला पाठदुखी होऊ शकते.

VIEW ALL

Read Next Story