कोलेजनच्या कमतरतेमुळे काय परिणाम होतो?

Published by: Zee Team | Feb 10, 2025

कोलेजन

शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणारे कोलेजन हे एक प्रोटीन असून शरीरात मोठ्या प्रमाणात आढळते.

Published by: Zee Team | Feb 10, 2025

कोलेजनची कमतरता

शरीरात कोलेजनची कमतरता ही गंभीर समस्या ठरु शकते. जाणून घेऊया, कोलेजनच्या कमतरतेची कारणे आणि त्याची लक्षणे.

Published by: Zee Team | Feb 10, 2025

त्वचा कोरडी होणे

हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे हे साहजिक असते. मात्र, अचानक त्वचा कोरडी पडून निस्तेज होत असेल तर शरीरात कोलेजनचे प्रमाण कमी झालं असण्याची शक्यता असते.

Published by: Zee Team | Feb 10, 2025

त्वचेवर सुरकुत्या दिसणे

शरीरातील कोलेजनच्या कमतरतेमुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात आणि त्वचेची लवचिकता कमी होते.

Published by: Zee Team | Feb 10, 2025

चेहऱ्यावरील पिंपल्समध्ये वाढ

बऱ्याच कारणांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. शरीरात कोलेजनच्या कमतरतेमुळेही चेहऱ्यावर होतात. त्यांच्या खुणा लवकर भरल्या जात नाहीत.

Published by: Zee Team | Feb 10, 2025

डोळ्यांभोवती काळेपणा

डोळ्यांखाली खड्डे तयार होणे तसेच डोळ्यांभोवती काळेपणा ही शरीरातील कोलेजनच्या कमतरतेची लक्षणे असू शकतात.

Published by: Zee Team | Feb 10, 2025

केस आणि नखांवर परिणाम

कोलेजनच्या कमतरतेमुळे नखे कमजोर होतात आणि केससुद्धा गळतात.

Published by: Zee Team | Feb 10, 2025

कोलेजनची पातळी कमी का होते?

वाढत्या वयासोबत शरीरातील कोलेजनची पातळी कमी होऊ शकते. याव्यतिरिक्त, धुम्रपान, अल्कोहोलचे सेवन, साखरेचे अधिक सेवन, संतुलित आहार न घेणे यासारख्या कारणांमुळे शरीरातील कोलेजनचे प्रमाण कमी होते.

Published by: Zee Team | Feb 10, 2025

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Zee Team | Feb 10, 2025

VIEW ALL

Read Next Story