सध्या उन्हाळा सुरू झाला असून शरीरातील उष्णता कमी ठेवण्यासाठी या दिवसांमध्ये सब्जाचा बराच वापर केला जातो. ही एका वनस्पतीची बी असून, फालूदा, सरबत, ज्यूस अशा गोष्टींमध्ये किंवा साध्या पाण्यात मिसळूनही सब्जाचं सेवन केलं जातं.
सब्जाला हिंदीत काय म्हणतात माहितीये? तुकमलंगा. पाण्यात टाकताय सब्जाच्या बिया फुलतात आणि एक मऊसर द्रव्य असणारा टपोरा दाणा तयार होतो.
या सब्जामध्ये विटामिन A, K आणि प्रोटीन असतात. अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जास्त असल्यानं दर दिवशी सब्जाचं सेवन करणंही फायद्याचं.
सब्जाच्या सेवनामुळं हाडांना बळकटी मिळते. इतकंच नव्हे, तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीसुद्धा सब्जाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
त्वचेविषयक समस्यांवर सब्जा एक चांगला उपाय असून त्यामुळं चेहरा चमकदार होतो. त्यामुळं इथून पुढं तुम्हाला कोणी सरबतात तुकमलंगा घेणार का विचारलं, तर नाही म्हणू नका.....