साखर हा पदार्थ असा आहे जो न खाण्याचा विचार सहसा कुणीही करत नाही.
दिवसभरात कोणत्या ना कोणत्या कारणाने साखर पोटात जाते. मात्र साखरेचं अधिक प्रमाणातील सेवन हे शरीरासाठी घातक असतं.
पण जर तुम्ही एक महिना साखर खाल्ली नाहीत तर शरिरामध्ये 'हे' बदल नक्कीच दिसून येतील.
साखरेमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्यानं वजन वाढू शकते, पण एक महिना साखर कमी खाल्ल्यानं वजन कमी होऊ शकतं.
साखरेतील ग्लुकोजमुळे ब्लड शुगरची समस्या निर्माण होते,जर महिन्याभरासाठी साखरेचा आहारात समावेश केला नाही तर साखरेत नक्कीच फरक दिसू शकतो.
साखर कमी खाल्ल्यानं ह्रदयासबंधी आजार कमी होण्याची शक्यता आहे.
शरिरातील इम्युनिटी वाढवण्यासाठी साखरेचे प्रमाण कमी असणं गरजेचं आहे.
जास्त प्रमाणात साखरेचे पदार्थ खाल्ल्यानं पोट साफ न होण्याचं समस्या येऊ शकते.
(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)