लवंग ही भारतीय स्वयंपाक घरातील महत्त्वपूर्ण मसाला आहे. यामध्ये मँगनीज, व्हिटॅमिन के, फायबर याशिवाय अनेक अँटिऑक्सिडंट्स देखील यामध्ये आढळतात.
रोज १-२ लवंगा खाल्ल्यास सर्दी, खोकला इत्यादीपासून बचाव होतोच, याशिवाय अनेक आरोग्यदायी फायदेही होतात.
लवंगाच्या सेवनाने हिरड्यांमधून रक्त येणे, पायरोरिया, दातदुखी, हिरड्यांना सूज येणे यासारख्या समस्या उद्भवत नाहीत.
लवंगामध्ये कफविरोधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे दमा आणि खोकला यांसारख्या श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळतो
लवंगात मँगनीज आणि पोटॅशियमसारखे खनिजे आढळतात, जे शरीरात ब्लड सर्क्युलेशन सुधारतात, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजार दूर राहतात.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)