दह्यासोबत इसबगोल खाल्ल्याने होतील हे '5' फायदे

आरोग्यासाठी फायदेशीर

दह्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.पण तुम्हाला हे माहित आहे दह्यासोबत इसबगोल मिसळून खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

दह्यामध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात जे आरोग्य समस्या दूर करण्यास मदत करतात.

गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन

आरोग्य तज्ज्ञांच्या मते सकाळी रिकाम्यापोटी दह्यामध्ये इसबगोल खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून देखील आराम मिळतो.

पोटदुखी आणि अतिसार

दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स इसबगोल पोटदुखी आणि अतिसार या समस्येपासून आराम देते.

तणाव आणि डोकेदुखी

दह्यामध्ये इसबगोल मिसळू्न खाल्ल्याने तणाव आणि डोकेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

हृदयविकार

इसबगोलमध्ये असलेले फायबर हृदयविकाराचा धोका कमी करते.

रक्तदाब

दह्यामध्ये इसबगोलचे सेवन केल्यास रक्तदाब कमी होण्यास मदत होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story