हात आणि पायांना मुंग्या का येतात? दुर्लक्ष केल्यास गंभीर...

Neha Choudhary
Mar 05,2025


आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाला अशक्तपणा आणि थकवा जाणतो. अशा परिस्थितीत विश्रांती घेतल्यानंतरच ऊर्जा परत येते. पण तरीही सतत हातपायांमध्ये मुंग्या येत असेल तर याकडे दुर्लक्ष करु नका.


शरीरात वारंवार मुंग्या येणे हे पोषक तत्वांच्या कमतरतेमुळेदेखील असू शकतं. त्यावर उपचार केलं नाहीत तर ते गंभीर समस्या होऊ शकते.


जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर त्यामुळे हाता-पायाला मुंग्या येतात. हात पाय सुन्न होतात. अशावेळी व्हिटॅमिन बी 12 ची तापसणी करून घ्या.


व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मांसाहारी पदार्थ, दूध, अंडी आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.


शरीरात लोहाची कमतरता असते तेव्हाही वारंवार थकवा आणि अशक्तपणाची समस्या जाणवते. त्यामुळे अशावेळी लोह पातळी तपासून पाहा.


शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांसह बीट, डाळिंब आणि सुकामेवा यांचा समावेश करा.


त्याशिवाय शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे स्नायूंमुळे पेटके आणि अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे दररोज नारळ पाणी आणि ताजे फळांचे ज्यूस प्या.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story