तिशीनंतर महिलांनी काय खाणं टाळावं?

Nov 05,2024

शरीरातील बदल

तिशीनंतर महिला आणि पुरुषांच्या शरीरात सतत बदल होत असतात. या वयात संतुलित आहाराला प्राधान्य देणं महत्त्वाचं. तिशीनंतर काही खाद्यपदार्थ टाळणं हा त्याच सवयीचा भाग.

मेटाबॉलिजम

तिशीनंतर शरीरातील मेटाबॉलिजमची प्रक्रिया धीम्या गतीनं काम करते. ज्यामुळं स्थुलता, मधुमेह आणि हृयरोगाचा धोका वाढतो, त्यामुळं गोड पदार्थांचं सेवन टाळावं.

रिफाईंड कार्ब्स

व्हाईट ब्रेड, पास्ता आणि सफेद तांदळाचा भात अस रिफाईंड कार्ब्स खाणं टाळावं.

ट्रान्स फॅट

तळलेल्या खाद्यपदार्थांमध्ये ट्रान्स फॅट जास्त असतात, ज्यामुळं हृदयरोगाचा धोका वाढतो.

मीठाचं प्रमाण

तिशीनंतर जेवणातील मीठाचं प्रमाण कमी करावं. मीठाच्या अतीसेवनामुळं हृदय आणि किडनीच्या विकारांची शक्यता असते.

कॅफिन

तिशीनंतर कॅफिनचंही सेवन कमी करणं फायद्याचं. याशिवाय फास्ट फूडला नाही म्हणणं उत्तम.

डाएट सोडा

डाएट सोडामध्ये असणारे केमिकल्स शरीरातील मेटाबॉलिजम प्रभावित करतात. ज्यामुळं वजन वाढण्याचा धोका असतो. वयाची 30 वर्षे उलटल्यानंतर महिलांनी घरगुती अन्नपदार्थ, हिरव्या भाज्या, फळांचं सेवन करावं.

VIEW ALL

Read Next Story