हळद सूज कमी करण्यातही मदत करते. जर तुम्ही रोज जेवणाव्यतिरिक्त रोज 2 चिमूट हळद खाल्ली तर शरिरावर काय परिणाम होईल याचा विचार केला आहे का?
हळद ट्राइग्लिसराइड आणि खराब कॅलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करते. यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स, सूज तसंच कॅन्सरविरोधी गुणधर्म असतात जे जखम भरण्यात आणि संसर्ग बरा करण्यात मदत करतात.
हळदीत करक्यूमिन नावाचं कंपाऊंड असतं ज्यामध्ये सूजविरोधी आणि एंटीऑक्सिडेंट्स गुणधर्म आढळतात. रोज चिमूटभर हळदीचं सेवन केल्याने बेली फॅट वेगाने कमी होईल.
हळदीत एंटीऑक्सिडेंट आणि एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे तुमच्या त्वचेला चमकदार आणि निरोगी बनवण्यात मदत करतात. हळद तोंड येणं, काळे डाग यापासून सुटका करते.
हळदीत अनेक गुणधर्म असले तरी त्याचं अतीसेवन एलर्जी आणि अतिसार यासारख्या समस्यांना कारणीभूत ठरु शकते. हळदीत कॅल्शिअम ऑक्सालेटचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे अधिक सेवन किडनी स्टोनसाठी कारणीभूत ठरु शकतं.