'एकच प्याला' भारी झाला? कधी दारु प्यायल्यानं होतो जास्त नशा?
Sep 26,2024
मादक पदार्थांचे सेवन करणे हे शरीरासाठी फार हानिकारक असते. मात्र तरीही या पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. खास करून दारुसारख्या पेयांचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते.
बियर, रम, व्हिस्की, वोडका आदी विविध प्रकारच्या मादक द्रव्यांचे सेवन केले जाते. इथेही प्रत्येकाची आवड वेगवेगळ असते.
जास्तीत जास्त लोकं रात्रीच्या जेवणाआधी दारु पितात. या मद्यप्राशनानंतर भरपेट जेवतात. पण असं करणं योग्य आहे का ?
डिनरच्या आधी रिकाम्या पोटी दारू प्यायल्याने ती लवकर पचते. त्यामुळे तिचा परिणाम सुद्धा लवकर होतो. लवकर पचल्याने तिचा नशा लवकर चढतो.
डिनर आधी मादक द्रव्यांचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढून मधुमेह होण्याची शक्यता वाढते कारण दारू ग्लुकोज मेटाबॉलिजमवर परीणाम करते. जे शरीरासाठी हानिकारक आहे.
डिनर नंतर दारू प्यायल्यास पोटातील अन्नामुळे ती झटपट न पचता. हळूहळू पचते. या प्रक्रियेचा रक्तातील साखरेवर प्रभीव कमी पडतो.
डिनर आधी सेवन केल्याने पित्त होण्याची शक्यता असते. एवढेच नाही तर अल्सर होण्याची भीतीसुद्धा असते.
डिनरच्या आधी दारु प्यायल्याने कॅलरिजवरसुद्धा परीणाम होतो. मद्यप्राशनानंतर अती जेवणे किंवा अयोग्य पदार्थं खाल्याने शरीराला त्रास होतो.
डिनर नंतर दारू प्यायल्याने पचनव्यवस्थेवर परीणाम होतो आणि झोपसुद्धा प्रभावित होते.
एकंदरीत मद्यप्राशन न करणंच योग्य आहे, मात्र तुम्ही सेवन करणारच असाल तर डिनर नंतर मादक द्रव्य पिणे हे जेवणाआधी पिण्यापेक्षा कमी अपायकारक आहे.