मनुष्याच्या शरीरासाठी पाणी अमृतासारखं आहे. आपल्या शरीरात 60 ते 70 टक्के पाणी असतं.
WebMd ने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येकाने दिवसात किमान 8 ग्लास पाणी प्यायला हवे. असं असलं तरी प्रत्येकाच्या शरीरावरही अवलंबून असतं.
खाताना पाणी पिण्याबद्दल सोशल मीडियात अनेक मतमतांतरे आहेत. जेवताना पाणी पिऊ नये असे अनेक इन्फ्ल्यूएन्सर सांगतात.
यामुळे पोटात गॅस बनायला सुरुवात होते आणि बद्धकोष्टता वाढते. जेवताना पाणी प्यायल्यास पचनावर परिणाम होतो. बॉडीमध्ये टॉक्सिस जमा होतं.
जेवताना पाणी प्यायल्यास पचनात अडचणी येत असल्याचेदेखील सांगतात.
त्यामुळे जेवताना पाणी प्यायचं का नाही? असा प्रश्न विचारला जातो.
जेवताना पाणी प्यायल्याल अपचन होतं याचा वैज्ञानिक पुरावा नाही, असे तज्ज्ञ सांगतात.
जेवण्याच्या आधी किंवा जेवताना पाणी प्यायल्यास पचनाला मदत होऊ शकते. यामुळे पोट लवकर भरते आणि तुम्ही जास्त खाण्यापासूनही वाचता.
अमेरिकन वेबसाइट हेल्थलाइन नुसार, जेवण्याआधी किंवा जेवताना पाणी पिणं योग्य असतं.
वजन घटवू इच्छिणाऱ्यांसाठी तर ही युक्ती फारच उपयोगी येऊ शकते.