सकाळची सुरुवात असो वा संध्याकाळचा नाश्ता; दररोज खावे तुपात भाजलेले शेंगदाणे

Intern
Apr 10,2025


आपण अनेकदा पाहतो की लोक मखाने, बदाम, काजू यांसारखे ड्रायफ्रूट्स आवडीने खातात.


मात्र, तुपात भाजलेले शेंगदाणे खाण्याचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का?


जाणून घेऊयात तुपात भाजलेल्या शेंगदाण्यांचे कोणकोणते फायदे आहेत.


तूप आणि शेंगदाणे एकत्र खाल्ल्याने शरीराला आवश्यक उर्जा मिळते. तसेच त्वचेला पोषण मिळून नैसर्गिक चमक येते.


शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रथिने असतात. जे स्नायू बळकट करण्यात मदत करतात.


तुपात भाजलेले शेंगदाणे पोट हलके ठेवतात आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.


शेंगदाण्यांमध्ये असलेले हेल्दी फॅट्स हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते.


दररोज शेंगदाणे खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती वाढते.


तुपात भाजलेले शेंगदाणे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. तसेच त्यातील पोषक घटक हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर असतात.


रोजच्या आहारात तुपात भाजलेले शेंगदाणे थोड्याशा प्रमाणात समाविष्ट केल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story