'या' पाच लोकांनी चुकूनही खाऊ नये आवळा, नाहीतर आरोग्यावर होईल विपरीत परिणाम

Tejashree Gaikwad
Apr 05,2025


आवळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु काही लोकांनी तो खाणे टाळावे, अन्यथा त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

लो ब्लड शुगर

आवळा रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतो, ज्यामुळे अशक्तपणा आणि चक्कर येऊ शकते. लो ब्लड शुगर असलेल्यांची याचे सेवन करू नये.


यामुळे रक्तदाब आणखी कमी होऊ शकतो, ज्यामुळे डोकेदुखी, थकवा आणि चक्कर येऊ शकते.

स्टोनचे रुग्ण

आवळ्यामध्ये ऑक्सलेट नावाचे तत्व आढळते, ज्यामुळे किडनी स्टोनची समस्या वाढू शकते.

आम्लपित्त आणि पोटाच्या समस्या असलेले लोक

आवळा खूप आंबट असतो, ज्यामुळे गॅस, ऍसिडिटी आणि पोटदुखी होऊ शकते.

शस्त्रक्रिया होणार असेल तर

जर तुमची कोणतीही शस्त्रक्रिया होणार असेल तर आवळा खाणे टाळा कारण त्याचा रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो आणि रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढू शकतो.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story