लाल, पिवळे की हिरवे? आरोग्यासाठी कोणते सफरचंद अधिक फायदेशीर?

Published by: Intern | Apr 01, 2025

सफरचंद खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. बाजारात विविध प्रकारचे सफरचंद उपलब्ध असतात.

Published by: Intern | Apr 01, 2025

मात्र, प्रत्येक रंगाच्या सफरचंदाचे पोषक गुणधर्म वेगवेगळे असतात. पाहूयात प्रत्येक रंगाच्या सफरचंदाचे आरोग्यास कोणते फायदे होतात.

Published by: Intern | Apr 01, 2025

हिरवे सफरचंद

हिरव्या सफरचंदामध्ये अनेक पोषक घटक असतात. यामध्ये साखरेचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

Published by: Intern | Apr 01, 2025

यामध्ये व्हिटॅमिन A आणि C तसेच अँटीऑक्सिडंट्स आढळतात. जे पचनक्रिया सुधारण्यास आणि त्वचेच्या समस्यांना दूर ठेवण्यास मदत करतात.

Published by: Intern | Apr 01, 2025

लाल सफरचंद

लाल सफरचंदामध्ये फायबर, व्हिटॅमिन C आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळतात. जे रोगप्रतिकारक शक्तीला मजबूत बनवतात.

Published by: Intern | Apr 01, 2025

यामध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. जे हृदयरोग आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

Published by: Intern | Apr 01, 2025

पिवळे सफरचंद

पिवळ्या सफरचंदामध्ये व्हिटॅमिन A भरपूर असते. जो डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Published by: Intern | Apr 01, 2025

यामध्ये असलेले पोटॅशियम हृदयाच्या आरोग्यासाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी चांगले असते.

Published by: Intern | Apr 01, 2025

प्रत्येक रंगाच्या सफरचंदाचे आपल्या आरोग्याला विविध फायदे होऊ शकतात आणि यांचा नियमित आहारात समावेश करणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.

Published by: Intern | Apr 01, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Intern | Apr 01, 2025

VIEW ALL

Read Next Story