कॅन्सर हा एक असा आजार आहे जो ऐकताच मनात भीती निर्माण होते. हा एक गंभीर आणि प्राणघातक आजार आहे.
अनेकदा कॅन्सरचे उशिरा निदान झाल्यामुळे, उपचार करणे कठीण होते.
असा एक कॅन्सरचा प्रकार आहे जो शेवटच्या टप्प्यात आढळतो. अशा कॅन्सरच्या प्रकारामध्ये स्वादुपिंडाचा कॅन्सर समाविष्ट आहे.
स्वादुपिंडाच्या कॅन्सरची लक्षणे खूप उशिरा दिसून येतात, ज्यामुळे त्याचे उपचार कठीण होतात. म्हणूनच त्याला सायलेंट किलर असेही म्हणतात.
या कॅन्सरला सायलेंट किलर म्हटले जाते कारण सुरुवातीच्या टप्प्यात त्याची लक्षणे किरकोळ असतात किंवा जवळजवळ दिसूनच येत नाहीत.
बऱ्याच केसेसमध्ये, या कॅन्सरची लक्षणे दिसू लागतात तेव्हा कॅन्सर आधीच शेवटच्या स्टेजमध्ये पोहोचलेला असतो.
त्यामुळे या कर्करोगाच्या उपचारात यश मिळण्याची शक्यता खूपच कमी होते.