दूधासोबत कोणते पदार्थ खाऊ नये?

Intern
Mar 25,2025


दूध हे आरोग्यासाठी खूप पौष्टिक असते मात्र, काही पदार्थ दूधासोबत खाल्ल्यास पचनक्रियेवर वाईट परिणाम होऊ शकतात.

1. मीठ

दूधासोबत मीठ खाणे टाळावे, कारण यामुळे पचनक्रियेवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

2. संत्र

दूधासोबत आंबट पदार्थ जसे की संत्रे, लिंबू, मोसंबी खाणे टाळावे, कारण यामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या होऊ शकते.

3. मासे

दूधासोबत मासे खाणे धोकादायक ठरू शकते. यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो, तसेच त्वचेवरही वाईट परिणाम होऊ शकतात.

4. उडीद डाळ

दूध आणि उडीद डाळ एकत्र खाल्ल्यामुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते, त्यामुळे याचे सेवन टाळावे.

5. दही

आयुर्वेदानुसार, दूध आणि दही एकत्र खाणे टाळावे, कारण यामुळे पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो.

6. फणस

फणस आणि दूध एकत्र खाल्ल्याने गॅस आणि पोट दुखीच्या समस्या उद्भवू शकतात.

7. कलिंगड

कलिंगडासोबत दूध पिणे टाळावे, कारण यामुळे कॉलराच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

8. केळी

दूध आणि केळी एकत्र खाल्ल्यास बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.

9. मुळा

मुळा आणि दूध एकत्र खाणे पचनक्रियेत बिघाड आणू शकते, त्यामुळे याचे सेवन टाळावे.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story