आवळा की एरंडेल तेल, केसांच्या वाढीसाठी कोणते तेल उपयुक्त?

Intern
Dec 03,2024


हिवाळा येताच केसांच्या समस्या पुन्हा डोकावू लागतात. अशा परिस्थितीत केसांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.


केसांना मजबूत करण्यासाठी आणि चांगली वाढ होण्यासाठी केसांना तेल लावणे खूप महत्वाचे आहे.


अनेक लोक केसांना मजबूत करण्यासाठी आवळा किंवा एरंडेल तेल लावतात, परंतु तुम्हाला माहीत आहे का, या दोन्हीपैकी कोणते तेल केसांसाठी चांगले आहे?


आवळ्यामध्ये व्हिटॅमिन C, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक प्रकारचे अमीनो ॲसिड असतात, जे केस मजबूत करण्यास आणि टाळूचे आरोग्य राखण्यास मदत करतात.


एरंडेल तेलामध्ये फॅटी अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन E असते, जे केस जाड आणि लांब बनविण्यास मदत करते.


जर तुमचे केस पातळ आणि तेलकट आहेत तर तुम्ही आवळ्याचे तेल लावले पाहिजे. आवळ्याचे तेल केसांना पांढरे होण्यापासूनही बचाव करते.


तसेचं कोरडे केस असतील तर एरंडेल तेल लावावे. टाळूमध्ये रक्तप्रवाह वाढून केसांची वाढ होऊ लागते आणि गळती खांबते.


दोन्ही तेल केसांसाठी उपयुक्त आहे. परंतु तेल लावतांना तुमचा टाळू कोरडा आहे की तेलकट हे जाणूनचं तेल वापरावे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story