असं म्हटलं जातं की पाणी पिण्यासाठी चांदीच्या ग्लासाचा वापर केल्यास राग शांत होण्यात मदत होते.
चांदी हा एक असा घटक आहे ज्याची पाण्यासोबत रासायनिक क्रिया न होता पाण्यातील सर्व जीवाणूंचा नाश होतो.
चांदीच्या ग्लासातून पाणी प्यायल्यानं रोगप्रतिकारक शक्ति वाढते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो, परिणामी राग कमी येतो.
चांदीच्या ग्लासातून पाणी प्यायल्यामुळं शरीराला विविध संसर्गांपासून दूर ठेवता येतं. सकाळी उपाशीपोटी चांदीच्या ग्लासातून पाणी प्यायल्यास पचनक्रिया सुधारते.
चांदीच्या भांड्यातील पाणी शरीराला नैसर्गिक थंडावा देत असल्यामुळं रागावर नियंत्रण ठेवण्यात याची मदत होते.
थोडक्यात पाणी पिण्यासाठी चांद्च्या ग्लासाचा वापर केल्यास त्याचा शरीराला सकारात्मक फायदा होतो असं म्हटलं जातं.