ऍव्होकॅडो कोणी खाऊ नये ? ऍव्होकॅडो खाण्याचे दुष्परिणाम...

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Nov 06,2024


तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही अ‍ावोकाडोचे सेवन कमी करावे. कारण अ‍ावोकाडोमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्यान वजन लवकर वाढते.


अ‍ावोकाडोमध्ये हेल्दी मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असून सुद्धा मर्यादेपेक्षा जास्त खाऊ नये कारण हृदयरोग आणि कॉलेस्ट्रॉलसारखा त्रास वाढू शकतो.


ऍव्होकॅडोमध्ये फायबर्स असतात त्यामुळं ते पचनास फायदेशीर असतात. पण काही लोकांना ऍव्होकॅडोचे सेवन जास्त केल्याने गॅस, सूज किंवा पोटदुखी सारखा त्रास उद्भवू शकतो.


अ‍ावोकाडोमध्ये कर्बोदके (carbs)असतात परंतु डायबिटीजच्या रुग्णांनी अ‍ावोकाडोचे सेवन करु नये.


बऱ्याचं लोकांना ऍव्होकॅडोची ऍलर्जी असते. ऍव्होकॅडो खाल्ल्यानं त्यांना खाज, सूज, खोकला किंवा आणखी काही समस्या होऊ शकतात.


ऍव्होकॅडोचे सेवन जास्त केल्याने मळमळ, उलट्या किंवा उच्च रक्तदाब होऊ शकतो.


ऍव्होकॅडोमुळे रक्तामध्ये गाठी होण्याच्या समस्या उद्भवू शकतात.


Disclaimer - (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. )

VIEW ALL

Read Next Story