सध्या श्रावणाच्या निमित्ताने अनेकजण उपवास ठेवत आहेत. पण उपवास कोणी ठेवावा आणि कोणी ठेवू नये हेदेखील महत्त्वाचं आहे.
काही जणांना उपवास करणं टाळलं पाहिजे. अन्यथा त्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
मधुमेह असणाऱ्यांनी उपवास करु नये. इन्सुलिन घ्यावं लागत असल्याने उपवास करणं त्यांच्या आरोग्याला धोकादायक ठरु शकतं.
जर एखादी महिला गर्भवती असल्यास उपवास करणं सुरक्षित ठरु शकणार नाही. यामुळे बाळाला पोषणतत्वं मिळण्यात अडचण येऊ शकते.
ज्या वयात शरिराचा विकास होतो त्याच वयात उपवास करणं लहान मुलांसाठी योग्य नाही. लहान मुलांना आवश्यक पोषण मिळणं गरजेचं असतं.
हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार, किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय उपवास करु नये.
ज्यांना अशक्तपणा किंवा थकवा जाणवतो, त्यांनी उपवास करण्याच्या भानगडीत पडू नये. यामुळे आरोग्याची आणखी हानी होऊ शकते.
वृद्धांनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
दरम्यान उपवास करताना भरपूर पाणी प्यावे. हलका आणि पौष्टिक आहार घ्यावा, तसंच विश्रांती घ्यावी.