गुडघ्यामध्ये कट-कट आवाज का येतो? ही ऑपरेशनची वेळ?

Neha Choudhary
Apr 25,2025


अनेक वेळा अचानक चालताना किंवा पायऱ्या चढताना किंवा उतरताना गुडघ्यांमध्ये कट-कट असा आवाज येतो.


गुडघ्यांमधून कट-कट आवाज येणे म्हणेज गुडघ्या बदलण्याची वेळ आली आहे का?


तज्ज्ञ सांगतात की, गुडघ्यांमधील कूर्चा जीर्ण झाला तर हाडांमध्ये घर्षण होते, ज्यामुळे कट-कट आवाज येतो.


आहारतज्ज्ञ मनप्रीत कालरा सांगतात की, गुडघ्याच्या सांध्यामध्ये हवेचे फुगे तयार होतात, जे हालचाल करताना फुटतात. यामुळेही आवाज येतो.


चालताना किंवा बसताना गुडघे फुटण्याचा आवाज येतो तेव्हा पोषणाद्वारे ते बऱ्याच प्रमाणात बरे होऊ शकतात.


तुम्हालाही ही समस्या असेल तर व्हिटॅमिन डीचं सेवन करा. सांधे मजबूत होतील आणि कूर्चा तुटण्यापासून रोखल्या जातील.


गुडघ्यांमध्ये आवाज येण्याचे एक प्रमुख कारण ग्लुकोसामाइनची कमरता हे एक कारण असू शकतं. ग्लुकोसामाइन हे निरोगी कार्टिलेज राखण्यास मदत करते. तर सांधेदुखी आणि सूज कमी करते.


या लोकांनी चीज, अंड्याचा पांढरा भाग, मशरूम आमि चरबीयुक्त मासे हे व्हिटॅमिन डीचे सेवन करावे.


कॅल्शियम हाडांना बळकटी देतात. त्यामुळे तीळ, नाचणी, दूध आणि दहीचं सेवन करावे.


पोटॅशियमची कमी असू शकते, मात्र याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांना दाखवावे.


Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story