हिवाळ्यात अंजीर का खावं?

Saurabh Talekar
Jan 07,2024

अंजीर

घरी अनेकदा आजी-आजोबा हिवाळ्यात अंजीर खावं, असं म्हणताना तुम्ही ऐकलं असेल. मात्र हिवाळ्यात अंजीर का खावं? माहितीये का?

पोषक तत्वं

अंजीरमध्ये एंटीऑक्सीडेंट्स, फायबर, झिंक, मॅगनीज, मॅग्नेशियम आणि आयर्न सारखे पोषक तत्वे भरपूर प्रमाणात आढळतात.

रक्तदाबाची समस्या

अंजिरात पोटॅशियम खनिज असल्याने त्याचे नियमित सेवन केल्यास ब्लड प्रेशरची समस्या कमी होते.

हृदयाचं आरोग्य

अंजीरात मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट आढळते. यामुळे तुमच्या ब्लडप्रेशरला नियंत्रित करण्यास मदत मिळते. तसेच हृदयाचे आरोग्य राखण्यास देखील त्यामुळे मदत मिळते.

डायबेटिसमध्ये लाभदायक

अंजीरात मोठ्या प्रमाणावर पोटॅशियम आढळते. हे पोटॅशियम क्लोरोजेनिक एसिड आणि ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करत असते.

मासिक पाळीमध्ये आराम

अंजिरात झिंक, मॅगनिज, मॅग्नेशियम आणि आयर्न सारखे खनिज आढळतात. ही सर्व तत्वे पिरीयड्स दरम्यान महिलांना होणाऱ्या समस्यामध्ये खूपच लाभदायक आहे.

वजन कमी करायचंय?

अंजिरात कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम सारखे पोषक तत्वे आढळतात. त्यामुळे तुमचे मेटाबॉलिजम ठीक रहाते आणि वजन कमी होण्यास देखील मदत मिळते.

VIEW ALL

Read Next Story