लग्नाची भीती वाटतेय? सलमान खानसह तुम्हाला असू शकतो हा 'आजार'!

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jul 02, 2024

58 वर्षीय सलमान अजून अविवाहित

सलमान खानने आतापर्यंत अनेक मुलींना डेट केलं आहे. पण असं असलं तरीही तो अजूनही बॅचलर आहे. त्याने आतापर्यंत लग्न केलेलं नाही. याबाबत स्वतः वडिल सलीम खान यांनी खुलासा केला आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jul 02, 2024

नात्यात अडकतो पण

सलीम खान एका व्हिडीओत सांगतात की, सलमान सहज एका नात्यात अडकतो पण तो लग्न करण्याची हिम्मत करत नाही.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jul 02, 2024

मुलीमध्ये शोधतो आई

सलीम यांनी सांगितलं की, सलमान लग्न करण्यासाठी टाळाटाळ करतो. कारण त्याला भीती वाटते की, समोरच्या व्यक्तीमध्ये ते गुण आणि क्षमता नसतील ज्या त्याच्या आईमध्ये नसतील.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jul 02, 2024

त्याला मॅरेज फोबिया

सलीम खान यांनी सांगितल्यानुसार, सलमान खानला मॅरेज फोबिया आहे. ज्यामुळे तो आतापर्यंत अविवाहित आहे. जाणून घेऊया मॅरेज फोबिया ज्याला 'गामोफोबिया' देखील म्हटलं जातं.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jul 02, 2024

गामोफोबियाचे लक्षण

भविष्याचा विचार करुन पळ काढणे, वचनबद्धतेची भीती, कॅज्युअल रिलेशनशिपमध्ये राहणे, नात्यात अडकल्यावर इंटिमेसीची कमतरता, नातं तुटण्याची भीती

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jul 02, 2024

नातं शेवटपर्यंत न नेणे

गामोफोबियाचे रुग्ण नात्यात अडकतात. एवढंच नव्हे तर इमोशनल बाँडिंग देखील असते. पण कोणत्याही नात्याला शेवटपर्यंत पोहोचवण्याचा विचार करत नाही. नातं अर्धवटच सोडून देतात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jul 02, 2024

कमिटमेंटने घाबरतात

गामोफोबियाचे लोक फक्त नात्यातच नाही तर कामाबद्दलही विश्वास निर्माण करण्यास अडचण निर्माण होते. त्यांना असं वाटतं की, आपण कोणाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. ते भविष्याचा विचार करणेच बंद करतात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jul 02, 2024

गामोफोबियावर उपाय

गामोफोबियाचे लोकं कायमच अविवाहित राहतात असं नाही. या भीतीबाबत माहिती मिळाली तर कॉग्निटिव बिहेविअर थेरेपीच्या मदतीने यावर नियंत्रण मिळवता येते.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jul 02, 2024

VIEW ALL

Read Next Story