सावधान..! जास्त मीठ खाताय त्याचे दुष्परिणाम जाणुन घ्या

Feb 05,2024


काही लोकांना जास्त मीठ खाण्याची सवय अस्ते पण यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता अस्ते. जास्त मीठ खाण्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहित आहे का?


मीठाशिवाय जेवणाला चव येत नाही त्यामुळे जेवणात योग्य प्रमाणात मीठ असलं पाहिजे. जास्त मीठ झाल्यास जेवणाची चव तर बिघडतेच शिवाय त्याचे शरिरावर आणि आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतात. जास्त मीठ खाणं धोक्याचं असतं.


मीठामध्ये 40% सोडीयम असतं आणि हेच सोडीयम मीठाच्या माध्यमातून शरीरात जातं. तुम्ही जेव्हा गरजेपेक्षा जास्त मीठ खाता तेव्हा त्याचा तुमच्या शरिरावर गंभीर परिणाम होतो


गरजेपेक्षा जास्त मीठ खाल्यास हृदयरोग, रक्तदाव वाढ या सार्ख्या समस्या उद्भवतात. याशिवाय लठ्ठपणाचीही समस्या देखील निर्माण होते.


मीठ- सोडियमचं अति सेवन हे हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाला कारणीभूत ठरतं. यामुळे हार्टअॅटॅकचा धोका अधिक असतो.


एका व्यक्तीने पाच ग्रॅम पेक्षा कमी मीठ खायला पाहिजे. 2 ते 3 वर्षांच्या लहान मुलांना कमी प्रमाणात मीठ दिलं गेलं पाहिजे.


गर्भवती महिलांना 1,500 मिलिग्रॅम म्हणजे चार ग्रॅमच्या आसपास मीठ खावू शकतात. खासकरून आयोडिन युक्त मीठ खाण्यावर भर दिला पाहिजे.


बाहेरून आणत असलेल्या चमचमीत पदार्थांमध्ये मीठाचं प्रमाण जास्त असतं. चिप्स, कुरकुरे अशा पदार्थांमध्ये मीठाचं प्रमाण अधिक असतं असे पदार्थ खाणं शक्यतो टाळलं पाहिजे.


फ्रोजन किंवा साठवून ठेवलेले पदार्थ खाणं टाळलं पाहिजे या ऐवजी ताजे पदार्थ खाल्ले पाहिजेत. घरी जेवण बनवतानाही मीठाचं प्रमाण कमी करा.

VIEW ALL

Read Next Story