कॉफीसोबत आंबट, मसालेदार किंवा जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने पोटात ऍसिड तयार होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे पोटाशी संबंधित अनेक विकार होऊ शकतात.
लिंबूवर्गीय किंवा आंबट फळे कॉफीसोबत खाऊ नका. ऍसिड रिफ्लक्स होऊन पित्ताचा होईल त्रास.
चटपटीत आणि मसालेदार पदार्थ पोटात ऍसिडचे उत्पादन वाढवू शकतात, जे कॉफीसह एकत्रितपणे अपचन किंवा अस्वस्थता निर्माण करू शकतात.
चहासोबत अनेकदा गोड पदार्थ खाल्ले जातात. पण यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते आणि थकवा येऊ शकतो. गोड खाल्ल्याने सुस्ती येते.
दुग्धजन्य पदार्थांमधील कॅल्शियम कॉफीमधील संयुगांशी प्रक्रिया करू शकतात, ज्यामुळे काही पोषक तत्वांच्या शोषणावर परिणाम होतो.
अनेकदा रात्री जागायला सतत कॉफी चहासोबत एनर्जी ड्रिंक्सचाही मारा केला जातो. यामुळे चिडचिड होऊ शकते आणि शरीराची एनर्जी लो होऊ शकते.