एका पाकिस्तानी नागरिकालाही मिळालाय भारतरत्न; तुम्हाला कल्पनाही नसेल

कर्पूरी ठाकुर यांना यंदाचा भारतरत्न

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांना यंदाचा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

भारतातील सर्वात मोठा नागरी पुरस्कार

भारतरत्न हा भारतातील सर्वात मोठा नागरी पुरस्कार आहे. मात्र हा पुरस्कार एका पाकिस्तानी व्यक्तीलाही मिळाला आहे.

भारतरत्न मिळवणारी पाकिस्तानी व्यक्ती

आता भारतरत्न मिळवणारी पाकिस्तानी व्यक्ती कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचबद्दल जाणून घेऊयात...

2 परदेशी नागरिकांना मिळालाय भारतरत्न

2 वेळा भारतरत्न परदेशी व्यक्तींना देण्यात आला आहे. यापैकी एक नाव म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला.

दक्षिण आफ्रिकन व्यक्तीला भारतरत्न

नेल्सन मंडेला यांना 1990 साली भारतातील हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दक्षिण आफ्रिकेचे गांधी

नोबेल पुरस्कार विजेत्या मंडेला यांनी वर्णभेदाविरुद्ध आयुष्यभर लढाई दिली. त्यांना दक्षिण आफ्रिकेचे गांधी असंही म्हटलं जायचं.

भारतीय नसताना भारतरत्न जिंकणारी पहिली व्यक्ती

याशिवाय भारतीय नसताना भारतरत्न पुरस्कार पटकावणारी पहिली व्यक्ती ही पाकिस्तानी आहे.

या व्यक्तीचं नाव आहे अब्दुल गफ्फार खान. भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठीच्या लढ्यात अब्दुल गफ्फार खान यांनी मोलाची भूमिका बाजवलेली.

गांधीचे अनुयायी

अब्दुल गफ्फार खान हे महात्मा गांधींच्या विचारांचे अनुयायी होते. त्यांनी प्रतिकार चळवळीच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाचं योगदान दिलं.

1987 साली भारतरत्न देण्यात आला

अब्दुल गफ्फार खान यांना याच योगदानासाठी 1987 साली भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

VIEW ALL

Read Next Story