कलिंगड गोड आणि लाल आहे का नाही हे ओळखण्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत.
या 3 सोप्या पद्धती तुम्हाला कलिंगड खरेदी करताना उपयोगी ठरू शकतात.
कलिंगडचे दोन प्रकार आहेत. एक गोल आणि लंबगोल. त्यामधील तुम्ही गोल कलिंगड विकत घ्या. ते गोड असते.
तर जे लंबगोल असते त्यामध्ये पाण्याचे प्रमाण हे खूप जास्त असल्यामुळे ते कमी गोड असते.
ज्या कलिंगडावर पिवळा डाग असते ते खूप गोड असते. तर पांढरा डाग असणारे कलिंगड हे कमी गोड असते.
त्यासोबतच कलिंगडावर बारिक रेषा असतात. ज्यामध्ये रेषा एकमेकींच्या जवळ असतात ते पिकलेले असते. तर रेषांमध्ये अंतर असेल तर ते पिकायचे राहिलेले असते.