'या' राज्यातील लोक भरतात सर्वात जास्त टॅक्स

Published by: Pooja Pawar | Aug 22, 2025

टॅक्स कलेक्शनमधून दरवर्षी सरकारच्या तोजोरीत मोठी रक्कम जमा होते. जर आपण आयकर विभाग आणि अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर देशात अशी काही राज्ये आहेत जी इतर राज्यांपेक्षा टॅक्स जमा करण्याच्या तुलनेत खूप पुढे आहेत.

Published by: Pooja Pawar | Aug 22, 2025

महाराष्ट्र :

महाराष्ट्र हा टॅक्स जमा करण्यात सर्वात पुढे आहे. 2024 च्या आर्थिक वर्षात 3.8 लाख कोटी रुपयांचं कलेक्शन करण्यात आलेलं आहे. तर एप्रिल 2025 मध्ये हा आकडा 41645 कोटी रुपये होता. ग्रोथ रेट किंचित कमी होऊन 11 टक्के झाला.

Published by: Pooja Pawar | Aug 22, 2025

गुजरात :

गुजरातने 2024-25 मध्ये 1.74 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन नोंदवले गेले. आतापर्यंत, एप्रिल 2025 मध्येच त्याचे योगदान 14970 कोटी रुपये होते. वार्षिक आधारावर, येथे 13 टक्के वाढ दिसून आली.

Published by: Pooja Pawar | Aug 22, 2025

कर्नाटक

कर्नाटक सुद्धा जीएसटी कलेक्शनमध्ये मजबूत स्थितित आहे. 2024 मध्ये राज्याने 1.43 लाख कोटी रुपयांचा जीएसटी वसूल केला. तर एप्रिल 2025 मध्ये हा आकडा 17815 कोटी रुपयांवर पोहोचला.

Published by: Pooja Pawar | Aug 22, 2025

तामिळनाडू

तामिळनाडू सुद्धा जीएसटी गोळा करण्यात मोठी भूमिका बजावतं. 2024 च्या आर्थिक वर्षात तामिळनाडू मधून 1.2 लाख कोटी रुपयांचा जीएसटी आला. तर एप्रिल 2025 मध्ये 13831 कोटी रुपये जमा झाले.

Published by: Pooja Pawar | Aug 22, 2025

उत्तर प्रदेश जीएसटी कलेक्शनमध्ये पुढे आहे. 2024 मध्ये राज्याने 1.5 लाख कोटी रुपयांचे योगदान दिले. एप्रिल 2025 मध्ये त्याचे संकलन 13,600 कोटी रुपये होते.

Published by: Pooja Pawar | Aug 22, 2025

एखाद्या राज्याचे देशातील टॅक्समधील योगदान हे केवळ महसुलाचा आकडा नाही. तर त्या राज्याची अर्थव्यवस्था किती मजबूत आहे हे सुद्धा दर्शवते.

Published by: Pooja Pawar | Aug 22, 2025

VIEW ALL

Read Next Story