अंबानींच्या 'हॅप्पी'पेक्षाही महागडा कुत्रा; बंगळुरूच्या उद्योगपतीकडे आहे इतक्या कोटींचा श्वान

Intern
May 01,2025


अंबानी कुटुंबाने त्यांच्या लाडक्या पाळीव कुत्रा हॅप्पीला कायमचं गमावलं आहे. हॅप्पीचा नुकताच मृत्यू झाला असून, कुटुंबाने भावनिक पोस्टद्वारे त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हॅप्पी कोणत्या जातीचा होता?

हॅप्पी हा गोल्डन रिट्रिव्हर जातीचा होता. बाजारात या जातीच्या कुत्र्याची किंमत अंदाजे 15000 ते 60000 रुपये दरम्यान असते.


अशातच लोकांच्या मनात अनेक प्रश्न उद्भवले आहे की, हा जगातील सर्वात महागडा कुत्रा होता का?


बंगळुरूमधील व्यावसायिक एस. सतीश यांच्या पाळीव कुत्र्याने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.


सतीश यांनी 50 कोटी रुपयांचा एक दुर्मिळ जातीचा कुत्रा विकत घेतला आहे.

ईडीकडून चौकशी

एस. सतीश यांचे वुल्फ डॉगसोबतचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यामुळे ईडीने त्यांच्या खरेदीविषयी चौकशी सुरु केली आहे.

कुत्र्याची जात आणि किंमत

हा कुत्रा 'कैडाबॉम्ब ओकामी' नावाच्या अत्यंत दुर्मिळ जातीचा आहे. हा कुत्रा वुल्फ डॉग प्रकारात येतो.


या जातीचे कुत्रे जगभरात फारच कमी ठिकाणी आढळतात. त्यामुळे त्याची किंमत इतकी प्रचंड आहे.

VIEW ALL

Read Next Story