आनंद महिंद्रा यांनी कार दिली भेट

2018 ला कृष्णकुमार आपल्या आईसह भारत भ्रमण करण्यासाठी निघाले आणि तेव्हापासून वेगवेगळ्या राज्यं, शहरात फिरत आहेत. कृष्णकुमार यांची ही गोष्ट उद्योजक आनंद महिंद्रा यांना समजली, तेव्हा त्यांनी त्यांना कार गिफ्ट दिली. ही कार कृष्णकुमार फारच गरजेचं असेल तर वापरतात.

आईच्या इच्छेखातर भारत भ्रमण

कृष्णकुमार सांगतात की, आपली आई चौदारथना अम्माने घर आणि घराच्या भिंती सोडून बाहेरचं जग पाहिलेलंच नाही. एकदा त्यांच्या आईने त्यांच्याकडे भारत भ्रमण करण्याची इच्छा बोलून दाखवली. यानंतर कृष्णकुमार यांनी आपली मोठ्या पगाराची नोकरी सोडून दिली.

वडिलांच्या मृत्यूनंतर आईला घेऊन बंगळुरुत स्थायिक

2016 च्या आधी दक्षिणामूर्ती कृष्णकुमार एकत्र कुटुंबात राहत होते. त्यांच्या कुटुंबात एकूण 10 लोक होते. वडिलांच्या मृत्यूनंतर ते आईला घेऊन बंगळुरुला आले होते.

मोठ्या कंपनीतील नोकरी सोडली

आई आणि मुलाची ही गोष्ट फारच रंजक आहे. दक्षिणामूर्ती कृष्णकुमार ब्रम्हचारी आहेत. बंगळुरमधील एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर ते कार्यरत होते.

65 किमीचा टप्पा पार

दक्षिणामूर्ती कृष्णकुमार यांनी आपल्या बजाज स्कूटरवरुन आतापर्यंत 65 हजार किमीचा टप्पा पार केला आहे. सध्या ते नागपुरात आहेत.

आईसह भारत भ्रमण

कर्नाटकच्या म्हैसूर येथील निवासी दक्षिणामूर्ती कृष्णकुमार आपल्या 73 वर्षीय आईसह भारत भ्रमण म्हणजेच मातृ सेवा संकल्प यात्रा करत आहेत.

VIEW ALL

Read Next Story