उन्हाळ्यात एसीचा वापर वाढतो आणि विजेचे बीलदेखील वाढते.
पण एक टनचा एसी एका तासात किती वीजेचा वापर करतो तुम्हाला माहिती आहे का?
एसी किती वीज वापरतो हे अनेक फॅक्टर्सवर ठरते.
यामध्ये एसी यूनिट टाइप, याची कॅपिसिटी आणि सेट केलेले तापमान यावर ठरते.
सर्वसाधारणपणे एसी प्रति तास 1000 आणि 2,500 वॉट वीजेचा वापर करतो.
5 स्टार रेटींगचा 1.5 टन स्प्लिट एसी प्रत्येक तासाला साधारण 1500 वॉटचा वापर करते.
1 टन क्षमतेचा 1 विंडो एसी प्रत्येक तासाला साधारण 900 वॉट विजेचा वापर करतो.
याचा अर्थ 8 तास एसीचा वापर केल्यास साधारण 7 यूनिट विजेचा वापर केला जातो.